प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हि भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. हि रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. पी.एम.किसान ही १०० टक्के केंद्र शासनाची योजना असून या योजनेस भारत सरकारचे १००% अर्थसहाय्य आहे.

या योजनेची सुरुवात २०१८ मध्ये झाली. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हि योजना खूप उपयोगी ठरली. पेरणीच्या आधी होणारी आर्थिक अडचण या योजनेने दूर करण्यास मदद केली. यंदा शेतकऱ्यांना २७ फेब्रुवारी २०२३ रोजी १३ वा हफ्ता देण्यात आला. हि रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्या मध्ये जमा होते.

योजनेसाठीची पात्रता
सर्व शेतकरी कुटुंब ज्यांच्याकडे पिकवता येऊ शकणारी शेती त्यांच्या नावांवर आहे आणि ज्यांना अपात्रतेची निकष लागू होत नाहीत ते सर्व जण या योजनेसाठी पात्र आहेत.

योजनेचे अपात्रतेचे निकष
खालील उच्च आर्थिक श्रेणीतील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत.

 • सर्व संस्थात्मक जमीनधारक
 • अशी शेतकरी कुटूंब जे खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधित आहेत.
 • संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.
 • आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
 • केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.
  चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
 • सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे
  चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
 • मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
 • नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

अधिक माहितीसाठी https://pmkisan.gov.in/ वेबसाइट ला भेट द्या